बंजारा समाज लढवय्या - उद्धव ठाकरे

बंजारा समाज हा लढवय्या समाज आहे. या समाजाला आपण शिक्षणाची सुविधा दिली तर ते देशाचा आधारस्तंभ होतील. संत सेवालाल महाराज हे केवळ बंजारा समाजाचेच नव्हते ते संपूर्ण जगाचे होते. असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
वाशिममध्ये बंजारा समाजाच्या संत सेवालाल मंदिर परिसरात विकास कामांच सोमवारी भुमिपुजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बालविकास मंत्री पंकजा मुंडे आदी मंत्रिमंडळातील नेते उपस्थित होते.
उद्धव यांनी मराठा आरक्षण कायदा लागू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळी त्यांचे कौतुक केले होते. उद्धव ठाकरेंना रामाचे आशिर्वाद मिळतील असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्यामुळे युतीतील या दोन्ही नेत्यांमध्ये जवळीक निर्माण झाल्याचे बोलले जात असून युतीबाबत सकारात्मक पाऊल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Review