राम मंदिराचा विषय हा कायदा करुनच सोडवावा लागणार - उद्धव ठाकरे

राम मंदिराबाबत न्यायालयाकडे बोट दाखवून चालणार नाही. राम मंदिराचा विषय हा कायदा करुनच सोडवावा लागणार आहे. राम मंदिर झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपवर शरसंधान केले आहे.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात सध्या दुष्काळाची भीषण स्थिती आहे. दिवसेंदिवस दुष्काळा आक्राळ-विक्राळ रुप धारण करेल. शिवसेना एकमेव असा पक्ष आहे. जो आपल्या संपूर्ण ताकदीने दुष्काळग्रस्तांच्या मागे उभा राहिला आहे. यापूर्वीही रामदास कदम आणि आदित्य ठाकरे यांनी विविध भागात जाऊन दुष्काळग्रस्तांसाठी कामे केली आहेत. शिवसेना नेहमी दुष्काळग्रस्तांना आधार देत आली असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

 

Review