विवाहितेची आत्महत्या, आई वडिलांनी व्यक्त केला घातपात,

पिंपरी ( सह्याद्री बुलेटिन ) - डी फार्मसी झालेल्या विवाहितेने ओढणीच्या सहायाने घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा घातपात आहे असा आई वडिलांनी संशय व्यक्त केला आहे.
स्नेहा स्वरुप क्षीरसागर (वय ३१, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना तीन महिन्यांचा मुलगा आहे.

ही घटना रविवारी (दि.२) वल्लभनगर येथे घडली.

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहाचा पती स्वरुप हा सराफी व्यवसाय करत होता. तिला तीन महिन्यांचा मुलगा आहे. सासरकडचे लोक वारंवार तिच्याकडे पैशांसाठी तगादा लावत होते. यामुळे ती एका मेडिकलच्या दुकानात कामाला देखील जात होती. स्नेहाच्या आई-वडिलांनी कित्येकवेळा स्वरुपला पैसेही दिले होते. मात्र तरी देखील तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून किंवा सासरकडच्यांनीच तिचा घातपात केल्याचा आरोप स्नेहाच्या नातेवाईकांनी केला आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करु पर्यंत आम्ही स्नेहाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भुमिका मृत स्नेहाच्या नातेवाईकांनी घेतली होती अखेर रात्री दीडच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

Review