भाजपला इतके वाईट दिवस आले का ? आयुष्यभर पक्षाचे काम करणाऱ्यांना सोडून माधुरी दीक्षितला पुणे लोकसभा तिकीट?

भाजपाध्यक्ष अमित शाह भाजपा संपर्क अभियानासाठी मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी माधुरी दीक्षितची तिच्या घऱी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी माधुरीला राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा होती आणि आता आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा पुण्यातून माधुरीला उमेदवारी देण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे. माधुरी दीक्षित निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या बातमीमुळे पुण्यात आणि विरोधकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

बाकी राज्यसभेतील भाजपाचे सहयोगी खासदार आणि लोकसभेसाठी देव पाण्यात ठेऊन बसलेले संजय काकडे यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. तर काँग्रेस पक्षाने सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे.

अर्थात या वावड्या आहेत. अजूनपर्यंत तरी अशी कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

Review