बेरोजगारांसाठी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची समूह ग्रुप योजना

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) - फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे बेरोजगारांसाठी महिला व युवकांसाठी रोजगार व व्यवसाय समूह ग्रुप योजना राबविणार असल्याची माहिती फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणात अल्पशिक्षित व उच्चशिक्षित तरुण व तरुणी आहेत त्यांना व्यवसायात उतरवून त्यामार्फत अनेकांना रोजगार मिळेल आधुनिक कारणासाठी मोठ्या उद्योगांना स्वयंचलित मशिनरी आयात करण्याची परवानगी दिली आणि उद्योगात वाढणाऱ्या रोजगार निर्मितीला अडथळे निर्माण केले मोठ्या उद्योगात कामगार कपात ठेकेदार कामगार स्वीकारण्यास परवानगी दिल्याने कामगारांचे बेरोजगारीत वाढ झाली उद्योगातील रोजगारी कमी झाली बँक आणि वित्त संस्था तर्फे मोठ्या प्रमाणात झालेली करोडो रुपयांची फसवणुकीबाबत कोणालाही दोषी ठरविण्यात सरकार व शासन अपयशी ठरले शासकीय धोरणात बदल करण्याची गरज असताना सरकार निर्णय घेऊ शकले नाहीत व बाहेरील कंपन्यांना सवलती देणे सुरूच आहे परिणामी देशातील उद्योग बंद करून बाहेरील उद्योग जोरात चालू आहे व देशातील लघुउद्योग नष्ट होऊन बेरोजगारी वाढली आहे देशातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कुठलेही व आत्महत्या रोखण्यासाठी सरकारला आलेले अपयश यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी व शहरातील सुशिक्षित बेकार तरुणांसाठी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे अनेक व्यवसायाच्या संधी व रोजगार यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

त्यासाठी महिलांना व युवकांना इलेक्ट्रिकल रिक्षा द्वारे एमाडिसी परिसरात कमीत कमी 22 ब्लॉक मध्ये अंतर्गत वाहतूक योजना चालू करण्यात येणार आहे त्याद्वारे कमीत कमी दोन हजार युवकांना रोजगार उपलब्ध होतील अन्य व्यवसाय उत्पादने तसेच प्रशिक्षण हे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत त्याची सुरुवात 14 तारखेला एमाडिसी ती ब्लॉक येथे दुपारी दोन वाजता काही बेरोजगार तरुणांना व महिलांना e-rickshaw मार्फत अनेक सोसायट्यांमध्ये सकाळच्या वेळी नाश्त्याचे पदार्थ व एम आय डिसी परिसरात त्यांनी बनवलेल्या उत्पादनांची विक्री व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील या योजनेचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे यावेळी अनेक बचत गटातील महिला ना त्यांची उत्पादने मार्केटमध्ये पोहोचविण्यासाठी तसेच त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देऊन एमाडिसी सारख्या मोठ्या परिसरांमध्ये त्याची विक्री करण्यासाठी ठीक ठिकाणी त्याचे स्टॉल उभे करून महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच इतर बेरोजगार तरुणांचे गट यांना या योजनेअंतर्गत काही संधी प्राप्त करून देण्यात येणार आहेत यासाठी काही कंपन्यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे वेगवेगळ्या तरुणांचे गट करून त्यामार्फत उत्पादने बनवण्यात येतील व त्याद्वारे अनेक तरुण बेरोजगारी पासून वाचतील एमाडिसी परिसरात अंतर्गत वाहतूक नाही कमीत कमी दोन हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन अंतर्गत वाहतूक सुरू करणार आहे, असे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले

Review