पतीचा खून करून मुलांवर आरोप, खुनी पत्नीचे पितळ उघडे...
पुण्यात पत्नीने साडीने गळा दाबून पतीची हत्या केली, आहे. मृतदेह घराच्या अंगणात जाळला, हत्येचा गुन्हा मुलांवर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तपास केला असता महिलेचं पितळ उघडं पडलं आहे.
पती पती निलेश कांबळे याचा खून पत्नी विद्या कांबळे हिने केला आहे.
विद्या कांबळे आपले पती निलेश कांबळे यांच्या दारुच्या व्यसनाला कंटाळल्या होत्या. रोज होणाऱ्या भांडणांमुळे विद्या कांबळे यांनी निलेश कांबळे यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. साडीने गळा दाबून त्यांनी पतीची हत्या केली. आपल्यावर संशय येऊ नये यासाठी त्यांनी थेट मुलांवरच हत्येचा आरोप केला.
जेवण वाढण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून मुलांनी ढकलल्याने पतीचा मृत्यू झाल्याचा खोटा बनाव त्यांनी केला. इतकंच नाही तर पतीच्या मृत्यूची माहिती लपवण्यासाठी विद्या कांबळे यांनी अंगणातच मृतदेह जाळून टाकला होता.