अमित गोरखे यांच्या प्रयत्नातून ३८ मागासवर्गीय विध्यार्थ्यांना मिळाले प्रतिष्ठित इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश
पिंपरी - उद्योजक व युवा नेतृत्व अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील मागासवर्गीय तसेच आर्थिकरित्या दुर्बल घटकातील २८ विद्यार्थ्यांना आरटीईच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाच्या उचभ्रू शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. समाजातील या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अमित गोरखे यांचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.
अमित गोरखे म्हणाले की, खास करून झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब, मागासवर्गीय, वंचित कुटुंबाना या योजनेत सामावून घेणे, योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि ती अमलात आणणे हे जोखमीचे काम आहे. पुढील वर्षी १०० कुटुंबातील विद्यार्थ्यांना हा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गोरखे यांनी सांगितले आहे.