नृत्य विभागात १४ पदके जिंकल्याबद्दल त्यांचा महापौर जाधव व पक्षनेते पवार यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार

पिंपरी ( सह्याद्री बुलेटिन ) - सुप्रियाज डान्स अकॅडमी, पिंपरी चिंचवड मधील स्पर्धकांनी दुबई येथील मदिनाथ थिएटर झुमिराह येथे झालेल्या अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, ऑफिशियल पार्टनर युनिस्को आयोजित ग्लोबल कल्चरल ऑलिम्पियाड २०१८ नृत्य नाट्य व गायन स्पर्धेत नृत्य विभागात सुवर्ण , रौप्य , कांस्य अशी एकूण १४ पदके जिंकल्याबद्दल त्यांचा महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेचे परीक्षण पद्मश्री डॉ, पं. दर्शना जव्हेरी (नृत्य गुरू) ,डॉ. जी.प्रतिश बाबू , ज्ञानरथ पुरस्कार जेत्या उज्ज्वला नगरकर आणि नेहा पाटकर यांनी केले. या स्पर्धेत भारतातील व भारताबाहेरील संस्थांचा सहभाग होता.सुप्रियाज डान्स अकॅडमीच्या संस्थापिका सौ सुप्रिया धाइंजे-संत यांना उत्कृष्ट
गुरू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये अनुजा इनामदार, समृद्धी यादव, खुशी हेगडे आणि स्वरा जांबवडेकर हे प्रथम पारितोषिक विजेते (सुवर्णपदक), श्रावणी चौंडकर, अनुष्का शेडगे, निशा शेळके आणि सुप्रिया संत हे द्वितीय पारितोषिक विजेते (रौप्यपदक), श्रेया शिंदे, सई टोणगावकर या तृतीय पारितोषिक विजेत्या (कांस्य पदक) तर सोहम शेटे, वेदांत वाडेकर, प्रिशा बन्सल, सृष्टी सक्सेना, हिमानी पुराणिक, अद्विता अगरवाल हे मेडीटोरियस अवॉर्ड विजेते ठरले. या सर्वांनी मिळून पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला. यावेळी या स्पर्धेचे आयोजन करणारे हेमंत वाघ व रत्ना
वाघ यांचे विशेष आभार मानले गेले.

Review