पिंपरी चिंचवड येथे लोकन्यायालयाचे आयोजन... शेकडो खटले निकाली...
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी व पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 8 डिसेंबर रोजी पिंपरी न्यायालयात व आकुर्डी मनपा न्यायालय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेकडो खटले निकाली काढण्यात आले. या कार्यक्रमात पिंपरी न्यायालयातील प्रभारी मुख्य न्यायाधीश एस. जी. अग्रवाल, सह न्यायाधीश ए. यु. सुपेकर व सह न्यायाधीश एन. टी. भोसले यांच्या उपस्थितीत तर आकुर्डी न्यायालयामध्ये न्यायाधिश मे. माधुरी खनवे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पाडला.या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणुन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्तारूढ पक्ष नेते एकनाथ पवार उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अंधश्रधा निर्मुलन समितीच्या पिंपरी चिंचवड विभागाच्या अध्यक्षा अॅड. मनीषा महाजन होत्या व पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन चे अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर, उपाध्यक्ष अॅड. योगेश थंबा, सचिव अॅड.गोरख कुंभार, महिला सचिव अॅड. स्मिता लांडे पाटील, सहसचिव अॅड. अंकुश एम. गोयल, ऑडीटर अॅड.महेश टेमगिरे, सदस्य अॅड.निलेश ठोकळ,अॅड. सुनील रानवडे, अॅड. पुनम राऊत, अॅड.केशव घोगरे, अॅड.विलास कुटे, अॅड.सुनील कड, अॅड.सुदाम साने , अॅड. सुरज खाडे, अॅड.पद्मावती पाटील, अॅड. निखील बोडके,अॅड. किशोर आरडकर, अॅड. गणेश राऊत, अॅड.संभाजी वाघमारे देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलतांना मुख्य अतिथी एकनाथ पवार यांनी न्यायालयाबाबतीतील सर्व प्रश्न सोडविण्याकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वपरीने मदत करेल अशी हमी दिली व बार चे अध्यक्ष अॅड.सुनील कडुसकर यांनी जास्तित जास्त पक्षकारांनी लोकन्यायालय सहभागी होवुन जास्तित जास्त खटले निकाली काढावेत असे आवाहन केले.
पॅनल परिक्षक म्हणून अॅड. सागर आडागळे, अॅड. जयश्री कुटे, अॅड. प्रतीक्षा खिल्लारी, अॅड. संगीता कुशालकर, अॅड.मनाली सावंत,अॅड. दिलीप शिंगोटे, अॅड. मोनिका गाढवे, अॅड. शिवाजी महानवर, यांनी काम पाहिले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अॅड.गोरख कुंभार यांनी केले तर आभार अॅड. महिला सचिव अॅड. स्मिता लांडे यांनी मानले.