
क्या बात है ? भले भले आम्हाला घाबरतात, आम्हाला पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदीही रस्ता बदलतात - संजय राऊत
आम्हाला पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदीही रस्ता बदलतात. आम्ही फाटके आहोत त्यामुळे भलेभले आम्हाला टरकून असतात. दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांचा दरारा आहे. असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. पिंपरीत खासदार श्रीरंग बारणे लिखित एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याच कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली.
या प्रकाशन सोहळ्याला श्रीरंग बारणे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक रामचंद्र देखणे, शहराध्यक्ष योगेश बाबर, गजानन चिंचवडे, सुलभा उबाळे या सगळ्यांची उपस्थिती होती. लाटेत वाहून जात मतदारांनी अनेक दुर्जनांना निवडून दिले, त्यामुळे लोकशाहीचे मंदिर आता राहिलेले नाही असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. एवढंच नाही तर सध्याच्या लाटेत वाहून जाणं आता मतदारांनी थांबवलं पाहिजे असंही राऊत यांनी म्हटलं आहे. ग्रामपंचायतीला पडलेला उमेदवार आमदार, खासदार झाला. गुन्हे दाखल असलेले लोक संसदेत आले त्यामुळे त्या मंदिराचे पावित्र्य उरलेले नाही असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.