साहित्यिक उत्तम तुपे यांना मदतीचा हात

पिंपरी ( सह्याद्री बुलेटिन ) - ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील अण्णा भाऊ साठे मातंग चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने आर्थिक सहाय मंगळवारी (दि.11) देण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी शंकर शिंदे यांनी मूळा रस्ता, खडकी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन ही मदत दिली.
साहित्यिक तुपे यांच्या परिस्थितीचे वास्तव विविध वृत्तपत्र व टीव्ही चॅनेलवर प्रसिद्ध झाले आहे. त्याची दखल घेऊन ही मदत देण्यात आली. या वेळी साहित्यिक तुपे यांच्या पत्नी जिजाबाई तसेच, सामाजिक कार्यकर्ते राजू रासगे, सुनील मोरे व कार्यकर्ते उपस्थित होते.
तुपे यांच्यावर नियमित वैद्यकीय उपचारासाठी पिंपरीतील संत तुकारामनगर येथील यशवतंराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात सोय करून देण्यात येणार आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे शंकर शिंदे यांनी त्यांना ग्वाही दिली.
फोटोओळ : ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना आर्थिक मदत देताना शंकर शिंदे. समवेत जिजाबाई, राजू रासगे, सुनील मोरे आदी.

Review