पराभवाचे अपचन, पराभूत उमेदवाराला हृदयविकाराचा झटका
नलगोंडा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि उमेदवार कोमाटी रेड्डी व्यंकट रेड्डी यांना आपला पराभव स्वीकरता आला नाही. पराभवाचे वृत्त् येताच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
युवक काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात कऱणाऱ्या कोमाटी रेड्डी व्यंकट रेड्डी नलगोंडा मतदारसंघातून १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडणून आले आहेत. मंगळवारी तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली. टीआरएसचे उमेदवार कांचरला रेड्डी यांनी त्याचा १६ हजार २३३ मतांनी पराभव केला.
वाय एस आर राजशेखर रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे . तेलंगणा राज्याच्या मागणीसाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता .