भाजप वाल्यानो, राहुल गांधींना ‘पप्पू’ बोलण्यापूर्वी १० वेळा विचार करा, - यशवंत सिन्हा
यापुढे राहुल गांधींना ‘पप्पू’ बोलण्यापूर्वी १० वेळा विचार करा, असा सल्ला यशवंत सिन्हा यांनी भाजपा नेत्यांना दिला आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेत बुधवारी यशवंत सिन्हा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते. सिन्हा म्हणाले, कालच्या तुलनेत आजची परिस्थिती बदलली आहे. झारखंडमधील भाजपाच्या अनेक नेत्याचे मला फोन आले. यातून भाजपाचे नेते नेतृत्वाला किती वैतागले आहेत, हे दिसून येते. गेल्या साडे चार वर्षात एका व्यक्तीलाच देवाचे स्वरुप दिले आणि तो कधी चुकू शकत नाही, असे काहींना वाटत होते. मात्र या निकालावरून भाजपामधील अहंकर मोडून निघाला आहे. तसेच देशातील नागरिकांमध्ये सरकार विरोधात तीव्र नाराजी पाहण्यास मिळत असल्याचेही या निकालातून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.