योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवा - उत्तरप्रदेशातच पोस्टरबाजी

भाजपाच्या पराभवानंतर लखनौमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवा असे पोस्टर लागले आहेत. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या एका संघटनेने हे पोस्टर लावले असून योगींना आणा, देश वाचवा असा संदेश त्यावर लिहिला आहे. या संघटनेने पुढच्यावर्षी १० फेब्रुवारीला लखनौमध्ये एका धर्म संसदेचे आयोजन केले आहे.

योगी आणा, देश वाचवा या संदेशाच्या बाजूला #Yogi4PM हा हॅशटॅग दिला आहे. या पोस्टरमधून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली आहे. मोदींना जुमलेबाज ठरवण्यात आले असून योगी हिंदुत्वाचे ब्रँड आयकॉन असल्याचे म्हटल आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन आदित्यनाथांचे कौतुक करताना मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.

 

Review