शिवशाही बस कशासाठी ? वाहतुकीसाठी कि अपघाताची...

गुरुवारी मुंबई- गोवा महामार्गावर दापोलीवरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाहीचा अपघात झाला असून या अपघातात सहा जण जखमी झाले आहे.
मुंबई- गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील गडब गावाजवळ शिवशाही बसचा आणि मिनी डोअर रिक्षेचा अपघात झाला. गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर नियंत्रण सुटलेली बस पलटली. अपघातात बसमधील चार तर रिक्षेतील दोन प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एसटी महामंडळाच्या शिवशाही बसच्या अपघातांचे सत्र सुरुच आहे.
शिवशाही बस कशासाठी ? वाहतुकीसाठी कि अपघाताची... हा एकाच सवाल आता प्रवासी विचारत आहेत.

Review