खामगाव परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्कार... वडिलांचा पोलीस स्टेशन मध्ये मृत्यू

यवत (सह्याद्री बुलेटिन ) - गुऱ्हाळावर काम करणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि हि तक्रार देण्यास गेलेल्या तिच्या वडिलांचा पोलीस स्टेशन मधेच मृत्यू झाला.
दौंड तालुक्यातील खामगाव परिसरात घडली.
नदीम, मोहसीन व दिलवाज अशी गुन्हेगारांची नवे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील पीडित तरुणी व तिचे कुटुंबीय खामगाव येथे मजूर काम करत होते. ठेकेदार नदीम याने पीडितेला १० आॅक्टोबर रोजी कासुर्डीच्या हद्दीत शेतात बोलावून घेतले. तेथे त्याचा भाऊ मोहसीन व साथीदार दिलवाज फुरकान (पूर्ण नावे माहीत नाही. तिघे रा. उत्तराखंड) यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. कोणाला काही सांगितल्यास जिवे मारू अशी धमकी दिली. मात्र, पीडितेने कुटुंबीयांसोबत गंगाहर पोलीस ठाणे (ता. रुडकी, उत्तराखंड) येथे फिर्याद दिली. ती यवत पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. त्यावरून मोहसीन व दिलवाज यांना अटक केलीे.
दरम्यान, पीडिता व तिचे वडील मंगळवारी यवत पोलीस ठाण्यात आले. तेथे वडिलांचा बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.

Review