नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग - रामदास कदम

‘नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही’ अशी टीका राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेता रामदास कदम यांनी केली.
रत्नागिरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
'राणेंनी आतापर्यंत किती पक्ष बदलले. शिवसेना सोडल्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. आता भाजपामध्ये आलेत. त्यांच्यासाठी आता फक्त रामदास आठवलेंचा पक्ष बाकी राहिलाय. राणे बघावं तेव्हा मातोश्रीवर टीका करतात. मात्र, आपली तेवढी औकात आहे का, हे त्यांनी तपासून बघावं. याच शिवसेनेच्या जोरावर नारायण राणे आणि त्यांच्या मुलाबाळांनी कोट्यवधींची संपत्ती कमावली. त्यामुळे मातोश्रीवर बोलण्याची त्यांची औकात आहे का? नारायण राणेंसारख्या व्यक्तीला ‘सूर्याजी पिसाळची अवलाद’ ही उपमादेखील कमी पडेल. नारायण राणे हा कोकणाला लागलेला काळा डाग आहे. हा डाग मी धुतल्याशिवाय राहणार नाही”. असं कदम म्हणाले.

 

Review