रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं - नितेश राणे
रामदास कदम यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेला अत्यंत जहाल शब्दात नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे.
राणेंनी ट्विटरद्वारे प्रत्युत्तर देताना अप्रत्यक्षपणे रामदास कदम म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं असल्याची आक्षेपार्ह टीका केली आहे.
”स्व. मान बाळासाहेब असतील, राजसाहेब असतील यांना कुत्रे आवडतात..उद्धव ठाकरें नी पण तीच परंपरा चालु ठेवली आहे…रामदास कदम च्या रुपत!! सतत भोकत असतो..त्याला हे माहित नाही..भूकणारे कुत्रे कधी चावत नाहीत !!” असं झोंबणारं ट्विट केलं आहे.