कारेगाव येथील पीडित कुटुंबीयांची आठवले यांनी घेतली भेट...

कारेगाव (ता. श्रीरामपूर) येथील मरण पावलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची आठवले यांनी भेट घेऊन सांत्वन केले. पीडित कुटुंबाला पक्षाच्या वतीने एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री निधीतून आणखी मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

कारेगाव येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आहे. कारेगाव प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. अहवाल प्राप्त होताच आरोपीस अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, राजाभाऊ कापसे, संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, सुनील शिरसाठ, भीमा बागूल, रमादेवी धिवर आदी उपस्थित होते.

 

Review