सी आय डी मालिकेतील चित्रोले FTII च्या अध्यक्षपदी...
सीआयडी या गाजलेल्या टीव्ही मालिकेचे गाजलेले पात्र चित्रोले साकारणारे आणि निर्माते दिग्दर्शक बी. पी. सिंग यांची FTII च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती पुढे आणली आहे. बिजेंद्र पाल सिंग हे आता FTII चे नवे अध्यक्ष असतील अशी पत्रकच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे.
सिनेमॅटोग्राफी हा बी. पी. सिंग यांचा मुख्य विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या टीव्ही आणि मनोरंजन जगतात कार्यरत आहेत. सीआयडी या त्यांच्या मालिकेला नुकतीच २१ वर्षे पूर्ण झाली. सीआयडी या मालिकेने लोकांच्या मनावर गारूड केले. अभिनेते अनुपम खेर यांच्या जागी सिंग यांची निवड करण्यात आली आहे. ४-३-१७ या कालावधीपासून त्यांचा तीन वर्षांचा कालावधी सुरु झाल्याचेही माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे. याआधी सिंग यांच्याकडे FTII चे उपाध्यक्ष पद होते.