दिलीप कुमारांना धमकावणाऱ्या बिल्डरची सुटका
मुंबई (सह्याद्री बुलेटिन ) - ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. बिल्डर समीर भोजवानीकडून येणाऱ्या धमक्यांना कंटाळून काही महिन्यांपूर्वी सायरा बानोंनी पोलीसात तक्रार दाखल केली होती. परंतु समीर भोजवानीची पोलीस कोठडीतून सुटका झाली आहे त्यामुळे, त्याच्यापासून असणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन सायरा बानो यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना केली आहे.
‘भू माफिया समीर भोजवानीची तुरुंगातून सुटका झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं तरीही कोणतीही कारवाई भोजवानीविरोधात करण्यात आलेली नाही. पैसे आणि बळाचा वापर करत पद्मविभूषीत व्यक्तीला धमकावलं जातं आहे आणि यासाठी मला तुमची मुंबईत भेट घ्यायची आहे.’ असं ट्विट सायरा बानो यांनी करत मोदींकडे मदत मागितली आहे .