पर्शियन मांजरीचा १६ व्या मजल्यावरून फेकल्याने मृत्यू - पुनः एकदा पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
ठाणे (सह्याद्री बुलेटिन ) - ठाण्यामध्ये पर्शियन माजरीला 16 व्या मजल्यावरुन खाली फेकून देत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सोनू असं या मांजरीचे नाव असून गनी शेख (वय ६५ ) असे तिच्या मालकाचे नाव आहे,
हि घटना कासारवडवली येथील एव्हरेस्ट कंट्रीसाइड कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे.
तर शिवराम पांचाळ असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने शिवराम पांचाळला हातात मांजरीला घेऊन जात असताना पाहिलं होतं. मांजर त्याच्या हातातून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करत होती. मांजरीला धोका असल्याचं मोलकरणीने ओळखलं होतं. तिने पांचाळकडे मांजरीला नुकसान पोहोचवू नका अशी विनंतीही केली होती. तिने थांबवण्याचाही प्रयत्न केला, मात्र पांचाळ ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता.