दीडशे चारचाकी वाहने चोरणाऱ्या सराईत चोरट्याना अटक.
पिंपरी (सह्याद्री बुलेटिन)- वाकड पोलिसांनी सुमारे दीडशे चारचाकी वाहने चोरणाऱ्या सराईत चोरट्याना अटक केली आहे.
राजू जावळकर ( रा. चिंचवड वय ५०) आणि सोमनाथ चौधरी अशी या आरोपींची नावे आहेत.
राजू बाबुराव जावळकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अहमदनगर,पुणे आणि सातारा या परिसरात चारचाकी गाडी चोरी केल्याप्रकरणी जवळपास १५० गुन्हे दाखल आहेत. तो नुकताच तुरुंगातून सुटला होता. तर त्याचा साथीदार सोमनाथ सुभाष चौधरी याच्यावर वाहनचोरीचे २५ गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राहटणी येथून छोटा हत्ती (चारचाकी गाडी) चोरली होती. त्याचा तपास वाकड पोलीस करत होते. पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,छोटा हत्ती खेड शिवापूर येथे आहे. त्यानुसार त्यांचे पथक रवाना झाले, त्या ठिकाणी दोन्ही आरोपी हे गाडी कट करत होते. त्यांना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला. आत्तापर्यंत त्यांच्या चौकशीतून सात गुन्हे उघड झाले आहेत.