यादव समाजाला पुढे नेण्यासाठी सर्वांनी संघठीत व्हावे - एल. आर. यादव

पुणे, पिंपरी-चिंचवड(सह्याद्री बुलेटिन)-शहरातील यादव समाजातील नागरिकांना पुढे नेण्यासाठी सर्वांनी संघठीत होणे आवश्यक आहे. सर्व समस्यांचे निराकरण करण्याची चावी शिक्षण आहे. त्यासाठी यादव समाजातील सर्वांनी मुलांना उच्चशिक्षण द्यावे. जेणेकरुन ते देश, आपल्या परिवारासाठी योगदान देऊ शकतील, असे मार्गदर्शन एलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशनचे संस्थापक अध्यक्ष एल. आर. यादव यांनी केले. तसेच शाळा प्रवेश तसेच शाळा, महाविद्यालये सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
श्रीकृष्ण चैरिटेबल ट्रस्टतर्फे रावेत येथे रविवारी (दि.16)यादव महासंम्मेलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी यादव बोलत होते. मसुरीतील आयएएस अॅकडमीचे मधुसुदन स्वामी, उद्योजक हरिशचंद्र यादव, आर्डिनेन्स फैक्टरीचे जनरल मॅनेजर डॉ. ओ पी. यादव, निवृत्त सैनिक एम. पी. यादव, भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश सचिव बबलू यादव, शिवसेनेचे पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार संतलाल यादव, रवी यादव, उद्योजक हंसराम यादव, रीना यादव, गीरीराज यादव, रामधनी यादव, राजेश यादव, रमेश यादव, श्रीनाथ यादव, बनवारी यादव,सुभाष यादव, एस. यादव, आर. सी. यादव, रामआधार यादव, अमृता यादव उपस्थित होते.
यादव समाजाचा प्रधानमंत्री यापूर्वीच झाला असता. परंतु, आपल्यातील मतभेदामुळे यादव समाजाचा नेता प्रधानमंत्री होवू शकला नाही अशी खंत व्यक्त करत यादव पुढे म्हणाले, पुणे जिल्ह्यात यादव समाजातील नागरिक मोठ्या संख्येने राहत आहेत. सर्वजण आपल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. परंतु, एकमेकांना ओळखत नाहीत. सर्वांना एकत्रित केल्यास समाजातील सर्वांचा विकास निश्चितच होईल. यासाठी असे कार्यक्रम सातत्याने होणे आवश्यक आहे. तसेच काहीजणांना शिक्षण, नोकरी, लग्न, रोजगार या क्षेत्रामध्ये अडचणी येत आहेत. त्यांना देखील सर्वांनी मदत करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
स्वामी मधुसुदन म्हणाले, यादवांचा जन्म दुस-यांचे कल्याण करण्यासाठी झाला आहे. दुस-यांना मदत करणे हा यादव समाजाचा पहिला धर्म आहे.

Review