काळेवाडीत निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या कीर्तनाला हजारोंची गर्दी

पिंपरी - (सह्याद्री बुलेटीन ) - मच्छिंद्रतात्या तापकीर सोशल फौंडेशनच्या वतीने कै. लक्ष्मीबाई भाऊसाहेब तापकीर यांच्या नवव्या पुण्यस्मरनानिमित्त ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील हजारो नागरिकानी कीर्तनाला हजेरी लावली.

काळेवाडी तापकीर नगर येथील लक्ष्मी निवास, मच्छिंद्र तापकीर यांच्या बंगल्याशेजारी सायंकाळी सहाच्या सुमारास कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचा झाला. माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.


तसेच शुक्रवारी सायंकाळी १० ते १२ ह.भ.प राधाकृष्ण गरड (गुरुजी) यांचे संगीत भजन रजनीचा कार्यक्रम संपन्न झाला. पुण्यस्मरनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी नावनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर, स्वीकृत नागरसदस्य विनोद तापकीर, देविदास पाटील,सागर तापकीर, हरेश तापकीर, मच्छिंद्र तापकीर, संतोष बारणे, सचिन चिखले,देवा अप्पा नखाते, विनायक मोरे, सुखदेव मोरे, नवीन तापकीर, विकास लांडे, अंकुशभाऊ राजवाडे, सुदाम कापसे, गरड गुरुजी, मानकर स्वामी संदीप पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Review