जीर्ण इमारत कोसळून महिला ठार ; 3 जखमी

अकोला (सह्याद्री बुलेटीन)-अकोल्यात एक इमारत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. तर त्याच कुटुंबातीलच अन्य तीन जण जखमी झाले आहेत. हि घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान तेलीपुरा चौकामध्ये घडली.

कल्पना चोपडे मृत झालेल्या महिलेचे नाव असून मंगेश चोपडे ,सुनीता चोपडे आणि योगेश चोपडे जखमी झाले आहेत. हि घटना तेलीपुरा चौकामध्ये घडली रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान जानकीराम चोपडे यांचे कुटुंबीय भोजन केल्यानंतर घरात बसले होते. त्यावेळी अचानक जीर्ण झालेली तीन मजली इमारत अचानक कोसळली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, पालिका कर्मचारी आणि आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. इमारत कोसळल्याची घटना घडताच काही वेळातच महापालिकेची जेसीबी घटनास्थळावर बोलावण्यात आली. मात्र कोसळलेली इमारत अरुंद जागेत असल्याने जेसीबी नेण्यास अडथळा निर्माण झाला. इतरांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आलं मात्र, ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी तीन तासांहून अधिक वेळ लागल्याने कल्पना चोपडे यांचा मृत्यू झाला.

 

Review