पुणे जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश आगरवाल यांची पिंपरी न्यायालयास भेट
पिंपरी (सह्याद्री बुलेटीन)- पुणे जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश आगरवाल यांची पिंपरी न्यायालयास भेट देऊन पिंपरी न्यायालयातील कामकाज व अडचणी यांची माहिती घेतली. या वेळी पिंपरी न्यायालयातील मुख्य न्यायाधीश के. एम. पिंगळे, ए. यु. सुपेकर , एन. टी. भोसले व एस. जी. आगरवाल उपस्थित होत्या.
यावेळी पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन तर्फे पुणे जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश आगरवाल यांचे स्वागत करण्यात आले, कार्यक्रमात आगरवाल यांनी बोलतांना म्हणाले की पिंपरी चिंचवड न्यायालयात अनेक समस्या आहेत, तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध झालेल्या नेहरू नगर येथील महा नगर पालिकेच्या इमारती मध्ये पिंपरी येथील न्यायालय तातडीने स्थलांतरित होणे अत्यंत आवश्यक आहे, पिंपरी चिंचवड करिता हायकोर्टाने मान्य केलेल्या न्यायाधीशांची संख्या वाढविणे करिता त्यांना जागा उपलब्ध करून देणे हे आवश्यक आहे. व त्याकरिता प्रयत्न होणे गरजेचे आहे .
या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन चे अध्यक्ष अॅड.ुनील कडुसकर, उपाध्यक्ष अॅड. योगेश थंबा,सचिव अॅड. गोरख कुंभार, सहसचिव अॅड.अंकुश एम. गोयल, खजिनदार संतोष मोरे,ऑडीटर अॅड. महेश टेमगिरे, सदस्य अॅड. पुनम राउत, अॅड. निलेश ठोकळ, अॅड. निलेश ठोकळ,अॅड. विकास बाबर, अॅड. केशव घोगरे व बार चेअॅड. मोनिका सचवाणी, अॅड. फ्रान्सीस भोसले,अॅड. अनिल सेजवानी हे व बार चे माजी अध्यक्षअॅड. सुहास पडवळ, अॅड. सतीश गोरडे, अॅड. विलास कुटे, अॅड. सुनील कड व अॅड. सुदाम साने, अॅड. पद् मावती पाटील, अॅड. दीपा कदम,अॅड. गणेश राउत, अॅड. दिलीप शिंगोटे, अॅड. बाळासाहेब रणपिसे, अॅड. प्रसन्ना लोखंडे, अॅड. बी. के. कांबळे, हे देखील उपस्थित होते.