मुंबईच्या वाहतूक कोंडीवरचा तोडगा मेट्रोचे जाळे उभारणार अशी घोषणा -पंतप्रधान
मुंबई (सह्याद्री बुलेटिन)- मराठीतून भाषणाची सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेट्रो पाचचे भूमिपूजन केले. छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे या सगळ्यांना अभिवादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका मांडली. कल्याण-ठाणे-भिवंडी या मेट्रोमुळे जोडले जाणार आहे. मेट्रो पाचमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात केला. मुंबईतील रेल्वेसाठी शेकडो कोटींचा निधी दिला. लवकरच पावणे तीनशे कीमी मेट्रोचे जाळे उभारणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.