मोदी शाही कि मोगलाई : सरकारवर टीका केली म्हणून पत्रकारावर कार्यवाही...

मणिपूर - पत्रकाराने सरकारवर टीका केली म्हणून त्याला एक वर्षासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्याचा अजब प्रकार मणिपूर येथे घडला आहे.
किशोरचंद्र वांगखेम असं या पत्रकाराचं नाव आहे. मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) एका वर्षासाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, 39 वर्षीय किशोरचंद्र यांनी फेसबुकवर एका व्हिडीओच्या माध्यमातून मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या व्हिडीओमध्ये त्यांनी, हे राज्यसरकार झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी करत असल्याचं मला दुःख होतंय आणि मी तितकाच हैराण आहे. कारण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा मणिपूरशी काहीही संबंध नाही, त्यांनी मणीपूरसाठी काहीच केलेलं नाही. तरीही त्यांच्या जयंतीनिमित्त मणिपूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय, कारण मुख्यमंत्री बीरेन सिंह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसच्या हातातील बाहुले आहेत अशी टीका त्यांनी केली होती असं सांगण्यात येत आहे. याशिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्याबाबत अवमानकारक शब्दांचा वापर केला होता असंही सांगितलं जातंय.
सरकारी धोरणावर टीका करून त्यांच्या चुका दाखवणे हे पत्रकारांचे काम असते पण त्यावरही निर्बंध येत असतील तर पत्रकारिताचं धोक्यात येते कि काय अशी भीती व्यक्त होत आहे.

Review