कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येची नोट सोडून कुटुंब बेपत्ता...
पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) - कर्जबाजारीपणामुळे चिंचवडच्या मोहननगरमधील कुटुंब सुसाइड नोट लिहून बेपत्ता झाले आहे.
संतोष शिंदे, सविता शिंदे असून मुकुंद शिंदे आणि मैथली शिंदे अशी बेपत्ता झालेल्यांची नवे आहेत. त्यांचा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय असून त्यांच्यावर दोन ते अडीच कोटींचं कर्ज होतं.
५ डिसेंबरला चिट्ठी लिहून चौघे बेपत्ता झाले. संतोष यांच्या भावाने ६ डिसेंबरला पोलिसांना याची माहिती दिली. संतोष शिंदे यांना दोन भाऊ आहेत. त्यापैकी एक त्यांच्यासोबत ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय तर दुसरा नोकरी करतो. मुलगा मुकुंद शिंदे हा मेकॅनिकल इंजिनियंरिंगचं शिक्षण घेत होता. चौघेही घर सोडून जाण्याआधी मोबाइल घऱीच ठेवून गेले असल्या कारणाने पोलिसांना शोध घेणं अवघड जात आहे.