नाताळ व कॉंग्रेस स्थापना दिवस बांधकाम कामगार मुलांच्या सोबत साजरा
चिंचवड,(सह्याद्री बुलेटीन)-चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसच्या वतीने नाताळ व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस स्थापना दिवस वर्धापनदिना निमित्ताने रावेत येथील मस्ती की पाठशाळा या बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी चालवली जाणाऱ्या शाळेमध्ये विविध भेट वस्तू खाऊ देऊन साजरी करण्यात आला.
या पाठशाळेत रावेत भागातील बांधकाम कामगारांच्या मुलांना एका शेड मध्ये शिक्षण देण्याचे काम करतात.या मुलांना राहणीमान स्वच्छता व वाचन लेखन या पाठशाळेत शिकविले जाते. हे सभासद विनामोबदला ही शाळा चालवित आहेत. अशा शाळेतील मुलामुलींसोबत त्यांना शालेय साहित्य, खाऊ, स्वच्छतेचे साहित्य देवून चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसने नाताळ व पक्षाचा वर्धापनदिन साजरा केला.
चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. संस्थेच्या संचालिका प्राजक्ता रुद्रावार ताई यांनी सहकार्य केले. उद्योजक प्रकाश दळवी ह्यांच्या हस्ते या मुलांना शालेय व स्वच्छतेचे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच या मुलांना शिक्षणाचे व स्वच्छते महत्व उद्योजक प्रकाश दळवी यांनी सांगितले. या प्रसंगी पिंपरी चिंचवड सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयूर जयस्वाल, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस सचिन नेटके,पिंपरी चिंचवड सोशल मीडिया अध्यक्ष चंद्रशेखर जाधव, चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे, चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेस सरचिटणीस शैलेश अनंतराव, संदीप पारवे, विशाल दौंडे, सागर पंडित, विजय वर्मा, स्वप्निल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.