सैराट मधील आर्ची-परश्याचा मुलगा प्रिन्स मामाचा घेणार बदला ?चित्रपटाचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार.
मुंबई,(सह्याद्री बुलेटीन)- दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपट तुफान गाजला. आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू आणि आकाशने केलेल्या अभिनयाला सर्वांनीच दाद दिली. बऱ्याच काळानंतर एका मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडले. आता या चित्रपटाचा पुढचा भाग देखील भेटीला येणार आहे. तुम्ही म्हणाल पहिल्या भागात तर आर्ची आणि परश्याचा मृत्यू झालेला दाखवला आहे मग आता पुढे काय? तर आता आर्ची-परश्याचा मुलगा मोठा झालेला दाखवण्यात येणार आहे. नागराज मंजुळेच सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.
आर्ची आणि परश्या हैदराबादला पळून गेले असताना तेथे सुमन अक्काने त्यांना आसरा दिला होता. सुमन अक्का म्हणजे छाया कदम यांनी ती भूमिका साकारली आहे. हीच सुमन अक्का सुरुवातीला या लहान मुलाचा सांभाळ करणार आहे. त्यानंतर मुलाचा ताबा त्याच्या मावशीकडे देण्यात येणार अशी ही कथा असेल. मावशीची भूमिका सर्वांची लाडकी सोनाली कुलकर्णी निभावणार आहे. आता आर्ची-परश्याचा मुलगा प्रिन्स मामाचा बदल घेतो का आर्चीचे घरचे या मुलाला स्वीकारतात हे चित्रपट पाहूनच कळेल.