अर्जून, छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा घ्यावा - चाबुकस्वार
पिंपरी चिंचवड (सह्याद्री बुलेटीन)- पिंपरी चिंचवड शहरात अर्जुन, छत्रपती, द्रोणाचार्य आदी पुरस्कार व पदके विजेते खेळाडू असून त्यांच्या अनुभवांचा वापर नव्या खेळाडूंनी करण्याची गरज असून ॲकॅडमिक प्रशिक्षणाची गरज असल्याचे असे मत आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी व्यक्त केले.
पिंपरी लिंक रोड येथील गोलांडे इस्टेट भागातील हिंदवी प्रतिष्ठान या संस्थेला आमदार निधीमधून कबड्डी मॅट लोकार्पण सोहळा कार्यक्रम झाला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते हि मॅट देऊन या प्रशिक्षण केंद्रांचे उदघाटन झाले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक प्रमोद कुटे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, हिंदवी प्रतिष्ठानचे उमेश गोलांडे, पद्मश्री पुरस्कार विजेते मुरलीकांत पेटकर, शिवसेना संघटिका ऊर्मिला काळभोर, रोमी संधू आदी उपस्थित होते.