पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर मध्यरात्री दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)-पिंपरी- चिंचवडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर रुप धारण करत असून गुरुवारी रात्री पोलीस आयुक्तालयासमोरच दोन जणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. किरकोळ वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
गुरुवारी रात्री पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर अमोल वाल्हे(वय.२० )आणि अप्पासाहेब कदम (वय २०, दोघेही रा.पेठ क्र.२२,ओटास्किम,निगडी ) या तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.अन्थोनी फ्रान्सिस (वय २२ ) आणि रॉबिन फ्रान्सिस(वय २५,दोघेही रा.पिंपरी) या दोघांनी हा हल्ला केल्याचे समजते. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर आरोपींनी कोयत्याने दोघांवर हल्ला केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्तालयासमोरच कोयत्याने हल्ला करण्याची मजल आरोपींनी गाठल्याने शहरात पोलिसांचा धाक उरला की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.