सव्वा चार लाख रुपये किमतीच्या 56 सायकली जप्त - निगडी पोलीसांची कारवाई.
निगडी,(सह्याद्री बुलेटीन)- सात अल्पवयीन मुलांकडून चार लाख 17 हजार पाचशे रुपये किमतीच्या 56 सायकल जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई निगडी पोलीसांनी केली आहे. यामुळे निगडीतील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना अंकुश चौक परिसरात दहा ते बारा वर्ष वयोगटातील मुले सायकल विकत असल्याची माहिती कर्मचारी रमेश मावसकर यांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मुलांकडे महागड्या सायकल असल्याचे दिसले याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कबूल केले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पण तब्बल 56 सायकल चोरल्याचे सांगितले. पोलीसांनी या सर्व सायकल हस्तगत केल्या विशेष म्हणजे या सायकल महागड्या असून त्यातील एका सायकलची किंमत 40 हजार रुपये आहे. सायकल चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आले असून शहरात कोणाच्या सायकल चोरीला गेल्या असतील तर त्यांनी निगडी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन,अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे,पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील,सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे,पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे,लक्ष्मण सोनवणे, कर्मचारी किशोर पढेर, स्वामीनाथ जाधव, संदीप पाटील, राहुल मिसाळ, विजय बोडके, गणेश शिंदे,सतीश ढोले, मितेश यादव यांच्या पथकाने केली.