सिम्बा’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड के कमाई
मुंबई,(सह्याद्री बुलेटीन) – अभिनेता रणवीर सिंह आणि सारा आली खान यांच्या ‘सिम्बा’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड के कमाई केली आहे. सिम्बा या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २२ कोटीचा गल्ला जमवला असल्याची माहिती ट्रेड ॲनालिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवर दिली. तर सिम्बाने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 88.58 लाख रुपये कमाई केली असल्याचे ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्शने ट्वीट करत सांगितले.
रणवीर सिंग, सारा अली खान, अजय देवगन यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळली आहे. भारतात ४०२० स्क्रिन तर जगभरातील ९६३ स्क्रिनवर ‘सिम्बा’ प्रदर्शित झाला. शाहरूखच्या ‘झिरो’कडून अपेक्षाभंग झाल्यानंतर ‘सिम्बा’कडे प्रेक्षक अधिक वळू लागले आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २२ कोटींहून अधिक कमाई करण्यास ‘सिम्बा’ यशस्वी झाला आहे.