भिवंडीत एमआयडीसीतील एका कपड्याच्या फॅक्टरीला भीषण आग; अग्निशामकच्या तीन गाड्या घटनास्थळी

ठाणे,(सह्याद्री बुलेटीन)-ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीत एका कपड्याच्या फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडल्याचे वृत्त आहे. या घटनेची वर्दी मिळताच अग्निशामक दलाचे तीन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर ही आग विझवण्याचे काम सुरु आहे. या आगीत किती नुकसान झाले याबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

Review