ट्रिपल तलाक’ विधेयक राज्यसभेत सादर-कायदामंत्री रविशंकर प्रसाद
नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन )- आज राज्यसभेत ‘ट्रिपल तलाक’ विधेयक मांडण्यात येणार आहे. कायदामंत्री रविशंकर प्रसाद हे विधायक राज्यसभेत सादर करणार आहे. गुरूवारी या विधेयकाला लोकसभेत मंजूरी मिळाली असून राज्यसभेत विधेयक मंजूर होऊ देणार नाही असे कॉंग्रेसने स्पष्ट मत मांडले आहे. लोकसभेत विधेयकाला मंजूरी मिळाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केली. लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने २४५ तर विरोधात ११ मत मिळाली होती. भाजप आणि कॉंग्रेसने खासदारांवर व्हिप जारी केला आहे. कॉंग्रेसने चर्चेसाठी बैठकही बोलवाली आहे.
राज्यसभेत भाजप आणि एनडीएचे पक्षाचे संख्याबळ नसेल तरी ही या विधेयकाला मंजूरी मिळेल असे शुक्रवारी कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. तसेच कॉंग्रेस आणि समविचारी इतर पक्ष हे विधेयक मंजूर होण्यापासून रोखतील, असे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.