नाळे प्रकरण : आरोपींना १४ जानेवारीपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर...
पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) - नाळे, केदारी केस प्रकरणी न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत आरोपींचा ५० हजारांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
चोरीच्या संशयावरून एका कामगाराला ताब्यात घेऊन पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली. तसेच त्याच्या सुटकेसाठी लाखो रुपये उकळले. असा आरोप रमेश गबाजी नाळे (वय ५६, रा. सिंहगडरोड, धायरी) व राजू त्र्यंबक केदारी (वय ४९, रा. कावेरीनगर, वाकड), किरण लांडगे (वय ४०, रा. औंध) यांच्यासह आणखी एकावर करण्यात आला आहे.
मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरल्याच्या संशयावरून आरोपींनी एका तरुणाला ताब्यात घेत बेदम मारहाण केली. विजेचा शॉक देखील दिला. त्याकडे काहीच मुद्देमाल सापडला नसल्याने त्यास ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करुन त्याच्याकडून आठ लाख रुपये घेतले. असा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणावर ५० हजाराचा अटकपूर्व जामीन १४ जानेवारी पर्यंत मंजूर केला आहे.
या प्रकरणात वकील म्हणून उदय वारुंजीकर आणि सुशील मंचरकर यांनी काम पहिले.