पुण्यात हेल्मेट सक्ती सुरु, ५०० रुपये दंड...

पुणे (सह्याद्री बुलेटिन ) : पुण्यातील वाहतूक समस्या तसेच गंभीर स्वरुपाच्या अपघातांची वाढती संख्या विचारात घेऊन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी नोव्हेंबर महिन्यात शहरात हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला होता. नवीन वर्षांपासून हेल्मेटसक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आजपासून पुण्यात हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे.
हेल्मेटसक्तीचे आदेश असूनदेखील पुण्यातील वाहनाचालक हेल्मेटचा वापर करणे टाळतात. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. अनेकदा प्रबोधनही झाले आहे असे असून देखील हेल्मेटचा वापर वाहनचालकांकडून होत नाही.
हेल्मेट न वापरल्यास प्रत्येकी 500 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.

Review