११९ तळीरामांवर पिंपरी चिंचवड शहरात कारवाई....

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन) : ३१ डिसेंबर रोजी मद्यप्राशन करून वाहन चालविणा-या ११९ तळीरामांवर पिंपरी-चिंचवड शहरातील नऊ वाहतूक विभागात कारवाई करण्यात आली आहे.
निगडी वाहतूक विभाग - ०६ ,चिंचवड वाहतूक विभाग - १०, चाकण वाहतूक विभाग - ०३, भोसरी वाहतूक विभाग - १९, पिंपरी वाहतूक विभाग - १६, हिंजवडी वाहतूक विभाग - ५३, दिघी वाहतूक विभाग, देहूरोड वाहतूक विभाग - ०९, तळवडे वाहतूक विभाग - ०३
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीच्या नियमांसह ड्रंक अॅंड ड्राइव्हवर सुद्धा पोलिसांची करडी नजर आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दारू पिऊन वाहन चालविणा-यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. रविवारी (दि. 30 डिसेंबर) पोलिसांनी 127 तर सोमवारी (दि. 31 डिसेंबर) 119 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणे धोक्याचे आहे. यामुळे अनेकदा अपघात होतात. फक्‍त 31 डिसेंबरच्या रात्री मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केल्यास मोठा विरोध होतो. यामुळे गुरुवारपासूनच (दि. 27) मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली होती.

 

 

Review