वाढदिवसानिमित्त नदी स्वच्छता करून - नगरसेवक सागर गवळींनी दिला सामाजिक संदेश
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन):- वाढदिवस म्हटलं की फलकबाजी, फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यात राजकीय नेत्यांचे वाढदिवस म्हटलं तर खूप मोठे कार्यकर्ते, डिजेचा कर्कश आवाज आणि बड्या नेत्यांची हजेरी असे समीकरण बनले आहे. मात्र, याला बगल देत भोसरीतील भाजपचे नगरसेवक सागर बाळासाहेब गवळी यांनी आपला वाढदिवस नदी स्वच्छता करत साजरा केला. दोन तास इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढून त्यांनी सामाजिक संदेश दिला आहे.