लढाऊ विमानामधील राहुल गांधींना काही कळत नाही : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची जोरदार टीका.

नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन) गेले दोन दिवस गदारोळामुळे संसदेचे कामकाज ठप्प झाल्यानंतर आज संसदेत राफेल प्रकरणी चर्चा सुरु आहे. या चर्चेवेळी राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी का मौन धारण करून आहेत? काल एएनआयला दिलेल्या मुलाखतीत राफेलबद्दल का बोलले नाहीत? संपूर्ण देश राफेल प्रकरणी प्रश्न विचारत आहे अशा प्रश्नांची सरबत्ती राहुल यांनी केली. या प्रश्नांना केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी राहुल गांधी यांना जेट विमानातले काही कळत नाही अशी बोचरी टीकाही केली.


केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत भाषण करताना राहुल गांधींवर जोरदार टीका केली. ‘राहुल गांधींनी संसदेत राफेलचा मुद्दा दोन वेळा उपस्थित केला आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणी सरकारची बाजू उचलून धरली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो. राहुल गांधी हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला कमी लेखत आहेत. गेल्या सहा महिन्यात राफेलवरुन बोलला गेलेला प्रत्येक शब्द खोटा आहे.’ असे जेटलींनी सांगितले.

काँग्रेसने राफेल प्रकरणी ॲडिओ क्लिप पत्रकार परिषदेत सादर केली होती. त्यात तत्कालीन संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुमध्ये राफेल प्रकरण्याच्या सगळ्या फाईल आहेत असा दावा केला होता. याच्यावर काँग्रेसने सादर केलेली ही टेप खोटी आहे असे जेटलींनी संसदेत सांगितले. याचबरोबर जेटलींनी राहुल गांधींना लढाऊ जेट विमानातील काही कळत नाही. काँग्रेस अध्यक्षांना फक्त पैसा कळतो देशाची सुरक्षा कळत नाही. असेही वक्तव्य केले.

इंडियन एअर फोर्सला राफेलची तातडीने गरज असल्यानेच हिंदुस्तान एरोनॉटिक्सला डिलीव्हरी देण्यास वेळ लागणार असल्यानेच दुसऱ्या कंपनीला कंत्राट देण्यात आले. एनडीएची ही राफेल डील युपीए पेक्षा ९ % स्वस्त आहे असा दावाही जेटलींनी केला.

Review