देहूरोड : मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक- गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)-देहूरोड परिसरातून मोबाईल फोनची जबरीचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात पोलीसांना अखेर यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट २ च्या टिमने सापळा रचून या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मयुर सुनिल महाजन (वय १९, रा. त्रिवेणीनगर तळवडे) व त्याचा अल्पवयीन साथीदार आणि अविनाश प्रकाश लोखंडे (वय २०, रा. विष्णु समुद्रे चाळ, विठ्ठलवाडी देहूरोड व त्याचा अल्पवयीन साथीदार यांना पोलीसांनी सापळा रचून देहूरोड येथून ताब्यात घेतले आहे. तसेच दुसऱ्या कारवाईत बाबा उर्फ शेंड्या राजेश मिसाळ (वय ३१ रा. सध्या साई मंदीरामागे, वेणूनगर वाकड) याला त्याच्या मुळ गावातून आंबेजोगाई, जिल्हा बिड येथून पोलीसांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून विविध कंपन्यांचे एकूण १ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे २९ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेत.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उप निरीक्षक हर्षल कदम न पोलीस कर्मचारी भिवसेन सांडभोर, संपत निकम, संजय गवारे, प्रविण दळे, फारूक मुल्ला, मयुर वाडकर, नितीन बहिरट, जमीर तांबोळी, संदीप ठाकरे, राहुल खारगे यांनी केली.

Review