क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे - नगरसेविका गीता मंचरकर
पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) - मुलींची पहिली शाळा सुरु करून महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग खुला केला यामध्ये सावित्रीबाईंची मोलाची साथ मिळाली, महात्मा फुले यांच्या पाठीशी सावित्रीबाई उभ्या राहिल्या, यामुळेच हे शक्य होऊ शकले, पती आणि पत्नीने एकमेकांना साथ दिली तर काय होऊ शकते हे फुले दाम्पत्यांनी दाखवून दिले. आज प्रत्येक व्यक्तीने यांचा आदर्श घेतला तर सामाजिक समस्यांबरोबरच कौटुंबिक समस्याही संपतील, असे प्रतिपादन नगरसेविका गीता मंचरकर यांनी केले.
खराळवाडी येथे आयोजित सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी नगरसेवक राहुल भोसले यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला आणि नागरिक उपस्तित होते.
आज स्त्रियांची जी प्रगती झाली तिचा उगम सावित्रीबाई आहेत याची जाणीव ठेऊन आपण वाटचाल केली पाहिजे, यासाठी सर्व महिलांनी एकत्र येणे, एकमेकींना साथ देणे गरजेचे आहे.असे आवाहनही मंचरकर यांनी केले.