खराळवाडी, कामगारनगर मधील आठवडी बाजाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) - ग्रामीण जीवनाची आठवण करून देणारा आणि नागरिकांना स्वस्त आणि मुबलक भाज्यांचा पुरवठा करणारा आठवडी बाजार खराळवाडी, कामगारनगर येथे नगरसेविका गीता मंचरकर आणि नगरसेवक राहुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना प्रत्येक वेळी मंडईत जाणे शक्य होत नाही अशा वेळी जर आठवडी बाजार आयोजित केला तर नागरिकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय टळते, यामुळे हे उपक्रम राबवून लोकांना सहकार्य करण्याचा आमचा हा खारीचा प्रयत्न्न आहे, असे नगरसेवक राहुल भोसले या वेळी म्हणाले.

आठवडी बाजाराच्या या शुभारंभाला नगरसेविका गीता मंचरकर तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला आदी नागरिक उपस्थित होते.

या उपक्रमाचा हजारो कुटुंबांनी लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

 

Review