पिस्तुल बाळगणा-याला ठोकल्या बेड्या

भोसरी,(सह्याद्री बुलेटीन)- बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली . तरुणाकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे . ही कारवाई पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली . रोहन सहदेव पाषणकर ( वय 23 , रा . नांदे म्हाळुगे रोड , म्हाळुगे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार , गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत पथकातील पोलीस शिपाई सावन राठोड यांना माहिती मिळाली की , एक इसम भोसरी मधील पीसीएमसी बस स्टॉप वर थांबला असून त्याच्या कमरेला पिस्तूल आहे त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून रोहन याला ताब्यात घेतले . त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि त्यामध्ये एक जिवंत काडतूस असा 25 हजार 500 रुपयांचा ऐवज मिळून आला . त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे . आरोपीवर आर्म ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील , पोलीस उपनिरीक्षक काळरा लांडगे , पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड , प्रमोद लांडे . सावन राठोड . महेंद्र तातळे , सचिन मोरे यांच्या पथकाने केली .

Review