न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
रहाटणी,(सह्याद्री बुलेटीन)- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटीप्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार , शाळेच्या मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाभिष , मंजुळा मुदलियार तसेच शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी , पालक उपस्थित होते . त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले . प्रियांका लाडे यांनी सूत्रसंचालन केले व रंजिता महातो यांनी आभार मानले .