मराठा आरक्षण हे एक प्रकारचे ‘गाजर’ आहे, पडद्यामागील सत्य त्यांना लवकरच समजेल- इम्तियाज जलील
मुंबई,(सह्याद्री बुलेटीन)- भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकसारखेच विषारी असून मराठा आरक्षण हे एक प्रकारचे ‘गाजर’ आहे, मराठा समाज सध्या त्यांची वाहवा करत असला तरी पडद्यामागील सत्य त्यांना लवकरच समजेल, असे विधान एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केले. एमआयएमला भाजपाविरोधी आघाडीत स्वारस्य नाही, आमची तिसरी आघाडी स्वतंत्र राहील, असेही त्यांनी म्हटले.
राज्य सरकारने मराठा समाजासाठी दिलेल्या 16 टक्के आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी याचिका इम्तियाज जलील यांनी केली आहे. राज्यात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असून त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसून, जाणुनबुजून डाववलं जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मुस्लिम समाजासाठी आरक्षण मंजूर केलं जावं अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.