राज्य सरकार देणार शेतकऱ्यांना मासिक पगाराची योजना - चंद्रकांत पाटील
सांगली :- सरकारी आणि खासगी नोकरदारांना जसा दरमहा निश्चित पगार मिळतो त्याच धर्तीवर राज्य सरकार इथून पुढे शेतकऱ्यांना मासिक पगार देण्याची योजना आणणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथे बळीराजा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते.
या योजनेविषयी अधिक माहिती देतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की, या योजनेत फक्त चार महिने संबंधित शेतकऱ्याने सरकारकडे हप्ते भरावयाचे आहेत. उरलेले हप्ते सरकार भरून दरमहा त्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या नावावर पगार मिळेल अशी व्यवस्था करणार आहोत.